पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले! जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले! जाणून घ्या आजचे दर

मुंबई | Mumbai

एक दिवसानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Hike) दरात वाढ केली आहे. देशातील जवळपास सर्व शहरांत आज पेट्रोल दरात जवळपास २५ पैसे प्रति लीटर, तर डिझेल दरात ३० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे.

देशातील चार प्रमुख महानगरांपैकी मुंबईमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल १०१.६४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८९.८७ रुपये प्रती लीटर, मुंबईमध्ये पेट्रोल १०७.७१ रुपये प्रती लीटर तर डिझेल ९७.५२ रुपये प्रती लीटर, चेन्नईमध्ये पेट्रोल ९९.३६ रुपये प्रती लीटर तर डिझेल ९४.४५ रुपये प्रती लीटर, कोलकातामध्ये पेट्रोल १०२.१७ रुपये प्रती लीटर तर डिझेल ९२.९७ रुपये प्रती लीटर विकले जात आहे.

सप्टेंबर महिन्यात भारतीय तेल कंपन्यांनी २४ सप्टेंबर रोजी २० पैशांनी, २६ सप्टेंबर रोजी २५ पैशांनी डिझेलचे दर वाढवले होते. तर २७ सप्टेंबर रोजीही डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवण्यात आलेले. काल पुन्हा एकदा २५ पैशांनी दरवाढ करण्यात आली तर आज लीटर मागे ३० पैशांनी दरवाढ झालीय. पेट्रोलचे दर मागील २२ दिवसांपासून स्थीर होते मात्र आता ते सुद्धा कालपासून वाढवण्यात आलेत. तर दोन दिवसांमध्ये पेट्रोल ४५ पैसे प्रती लीटरने महाग झालं आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने येत्या काही दिवसांत भारतात मोठी इंधन दरवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीने २०१८ नंतर पहिल्यांदाच उच्चांकी पातळी गाठली. त्यामुळे येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल ८० डॉलर्स इतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करणे अटळ मानले जात आहे.

Related Stories

No stories found.