Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दरवाढ थांबता थांबेना!

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दरवाढ थांबता थांबेना!

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

दिल्ली l Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार (Unemployed) झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून देशात इंधनाची दरवाढ (Fuel price hike) होत आहे. देशात लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.

आज पेट्रोलच्या किमती (Petrol price today) ३० पैशांनी तर डिझेलच्या किमतींमध्ये (Diesel price today) ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर १०३.२४ रुपये आणि डिझेलचे दर ९१.७७ रुपये इतके झाले आहेत.

देशातील २६ राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर १०० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या पार आहेत.

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली : पेट्रोल - १०३.२४ रुपये प्रति लीटर, डिझेल - ९१.७७ रुपये प्रति लीटर

मुंबई : पेट्रोल - १०९.२५ रुपये प्रति लीटर, डिझेल - ९९.५५ रुपये प्रति लीटर

कोलकाता : पेट्रोल - १०३.९४ रुपये प्रति लीटर, डिझेल - ९४.८८ रुपये प्रति लीटर

चेन्नई : पेट्रोल - १००.७५ रुपये प्रति लीटर, डिझेल - ९५.२६ रुपये प्रति लीटर

भोपाळ : पेट्रोल - १११.७६ रुपये प्रति लीटर, डिझेल – १००.८० रुपये प्रति लीटर

हैदराबाद : पेट्रोल - १०७.०९ रुपये प्रति लीटर, डिझेल - ९९.७५ रुपये प्रति लीटर

बंगळुरु : पेट्रोल - १०६.५२ रुपये प्रति लीटर, डिझेल - ९७.०३ रुपये प्रति लीटर

लखनऊ : पेट्रोल - १००.३१ रुपये प्रति लीटर, डिझेल - ९२.२० रुपये प्रति लीटर

दरम्यान कच्च्या तेलाच्या महागाईमुळे नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल ८० डॉलर प्रति बॅरल पोहोचले आहेत. त्यातच पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटाच लावला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com