Petrol Disel Price : आज पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'!

'या' १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलचे दर शंभरी पार
Petrol Disel Price : आज पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'!

दिल्ली | Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ (Fuel Price Hike) होत आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Disel Rate Hike) सातत्याने वाढ झाल्यानंतर आता ही वाढ काहीसी स्थिरावली आहे. आज (०९ जुलै) पेट्रोल आणि डिझेलचे दर ‘जैसे थे’ आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी तेलाच्या दरांत कोणतीही वाढ अथवा कपात केलेली नाही. त्यामुळे इंधन दरवाढीला एक दिवसाचा ब्रेक लागला आहे. यापुर्वी गुरुवारी पेट्रोल ३५ तर डिझेल ०९ पैश्यांनी महागले होते.

आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०६.५९ रुपये तर डिझेलचा भाव ९७.१८ रुपये इतका झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १००.५६ रुपये तर डिझेल ८९.६२ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.३७ रुपये तर डिझेल ९४.१५ रुपये आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १००.६२ रुपये तर डिझेलचा भाव ९२.६५ रुपये प्रती लीटर इतका आहे. तसेच भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०८.८८ रुपये तर डिझेलचा भाव ९८.४० रुपये इतका वाढला आहे.

दरम्यान, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, सिक्कीम, लडाख, पुडुचेरी, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठलेली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com