महंगाई डायन खाये जात है! सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

नगर, नाशिकमधील एका लिटरचे दर काय?
महंगाई डायन खाये जात है! सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

दिल्ली l Delhi

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची (Crude Oil Rate) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण उत्पादन कमी असल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे.

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike Today) दरात सलग चौथ्या दिवशी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेली जनता सततच्या इंधन दरवाढीमुळे आणखी त्रस्त झाली आहे. नवरात्रोत्सव झाल्यानंतर दिवाळी देखील तोंडावर आली आहे. अशामध्ये सततच्या महागाईमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

आज पेट्रोलच्या किमतीत (Petrol price today) ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किमतीत (Diesel price today) ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशाच्या राजधानीसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढले आहेत.

आजच्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल १०५.८४ रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलची किंमत आता ९४.५७ रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलसाठी १११.७७ रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक लीटर डिझेलसाठी १०२.५२ रुपये मोजावे लागत आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर (प्रतिलिटर रुपयांमध्ये)

पुणे : पेट्रोल - १११.६१, डिझेल - १००.७९

अहमदनगर : पेट्रोल - १११.८८, डिझेल - १०१.०६

नाशिक : पेट्रोल - ११२.४०, डिझेल - १०१.५२

औरंगाबाद : पेट्रोल - ११२.०९, डिझेल - १०१.२५

Related Stories

No stories found.