Petrol-Diesel Rate: पेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शंभरी पार

जाणून घ्या आजचा दर
Petrol-Diesel Rate: पेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शंभरी पार

दिल्ली l Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार (Unemployed) झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून देशात इंधनाची दरवाढ (Fuel price hike) होत आहे. देशात सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.

देशभरात पेट्रोल (Petrol price today)२६ ते ३०पैसे आणि डिझेल (Diesel price today) ३३ ते ३७ पैशांनी महागले आहे. मुंबईत पहिल्यांदाच डिझेलने शंभरीचा टप्पा (Petrol Diesel Price) ओलांडला आहे. तर मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोल शंभरीपार गेले आहे.

मुंबईत पेट्रोल १०९.८३ रु. प्रति लिटर आणि डिझेल १००.२९ रु. प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.८४ रु. प्रति लिटर आणि डिझेल ९२.४७ रु. प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.२३ रु. प्रति लिटर आणि डिझेल ९५.५८ रु. प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. चेन्नईत पेट्रोल १०१.२७ रु. प्रति लिटर आणि डिझेल ९६.९३ रु. प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

आंतरराष्ट्रीय तेल उत्पादनात घट झाली आहे. यामुळे काही प्रमाणात इंधनाच्या दरांत वाढ झाली आहे. इंधनावर जीएसटी लागू करण्याला राज्यांचा विरोध आहे. पेट्रोल, डिझेलसह सर्व प्रकारच्या इंधनावर केंद्र सरकारचे कर आणि राज्यांचे कर लागू आहेत. प्रत्येक राज्याकडून इंधनावर वेगवेगळे कर लावले जातात. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे.

Related Stories

No stories found.