Petrol Disel Price : आज पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'!, जाणून घ्या आजचे दर

इंधन दरवाढीला एक दिवसाचा ब्रेक
Petrol Disel Price : आज पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'!, जाणून घ्या आजचे दर

दिल्ली | Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ (Fuel Price Hike) होत आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Disel Rate Hike) सातत्याने वाढ झाल्यानंतर आता ही वाढ काहीसी स्थिरावली आहे.

आज (१३ जुलै) पेट्रोल आणि डिझेलचे दर ‘जैसे थे’ आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी तेलाच्या दरांत कोणतीही वाढ अथवा कपात केलेली नाही. त्यामुळे इंधन दरवाढीला एक दिवसाचा ब्रेक लागला आहे. यापुर्वी सोमवारी पेट्रोल २८ पैशांनी महाग झालं होत तर डिझेल १६ पैश्यांनी स्वस्त झालं होते.

प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली : पेट्रोल - १०१.१९ रुपये प्रति लिटर, डिझेल - ८९.७२ रुपये प्रति लिटर

मुंबई : पेट्रोल १०७.२० रुपये प्रति लिटर, डिझेल -९७.२९ रुपये प्रति लिटर

चेन्नई : पेट्रोल - १०१.९२ रुपये प्रति लिटर, डिझेल - ९४.२४ रुपये प्रति लिटर

कोलकाता : पेट्रोल - १०१.३५ रुपये प्रति लिटर, डिझेल - ९२.८१ रुपये प्रति लिटर

बंगळुरू : पेट्रोल - १०४.५८ रुपये प्रति लिटर, डिझेल - ९५.०९ रुपये प्रति लिटर

भोपाळ : पेट्रोल - १०९.५३ रुपये प्रति लिटर, डिझेल - ९८.५० रुपये प्रति लिटर

चंदीगढ : पेट्रोल - ९७.३७ रुपये प्रति लिटर, डिझेल - ८९.३५ रुपये प्रति लिटर

लखनौ : पेट्रोल - ९७.२९ रुपये प्रति लिटर, डिझेल ९०.११ रुपये प्रति लिटर

पाटना : पेट्रोल - १०३.९२ रुपये प्रति लिटर, डिझेल - ९५.३० रुपये प्रति लिटर

देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com