Petrol Diesel Price : सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price : सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या आजचे दर

दिल्ली | Delhi

भारतामध्ये पुन्हा इंधनदरवाढीचा (Fuel Price hike) भडका सुरूच आहे. आज तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत (Petrol, Disel Price hike) सलग तिसर्‍या दिवशी वाढ केली आहे. सध्या देशात उच्चांकी इंधन दर (Fuel rates) नोंदवण्यात आले आहे.

आज पेट्रोलच्या किंमतीत २५ पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलचे दर ३० पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल ११० रुपये लीटरच्या पुढे गेले आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सर्वात महाग इंधनाची विक्री (Highest Petrol Rate) होत आहे. मध्यप्रदेशातील सिवनीमध्ये पेट्रोल ११३.२८ रुपये प्रति लीटर आणि राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये ११३.०१ रुपये प्रति लीटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे.

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलच्या किंमती प्रतिलीटर १०२.१४ रुपये इतकी झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत हाच आकडा १०८.१९ रुपये प्रतिलीटर इतका वाढला आहे. त्याचवेळी या दोन्ही राजधान्यांमध्ये डिझेल्या किंमती अनुक्रमे ९०.४७ रुपये आणि ९८.१६ रुपये इतकी झाली आहे.

कोलकात्यामध्ये पेट्रोल १०२.७७ रुपये प्रतिलीटर तर डिझेल ९३.५७ रुपये प्रतिलीटर दराने विकलं जात आहे. चेन्नईमध्ये हे दर अनुक्रमे ९९.८० रुपये आणि ९५.०२ रुपयेप्रतिलीटर अस आहेत. तसेच पुण्यात आज पेट्रोलचा दर १०७.७१ रुपये लिटर झाला असून डिझेलचा दर ९६.१९ रुपये लिटर झाला आहे.

Related Stories

No stories found.