Petrol-Diesel Prices : थोडासा दिलासा! पेट्रोल-डिझेल दरवाढीला लागला ब्रेक, जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Prices : थोडासा दिलासा! पेट्रोल-डिझेल दरवाढीला लागला ब्रेक, जाणून घ्या आजचे दर

दिल्ली | Delhi

देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर ()petrol disel rate today ऐतिहासिक उच्चांकावर आहे. ऐन दिवाळीत पेट्रोल (petrol) आणि डिझेल (disel) दररोज किंमतीचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहेत. अशातच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर ठेऊन नागरिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे.

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये पेट्रोल (Petrol ) डिझेलचे (Diesel) दर अनुक्रमे ११०.०४ रूपये आणि ९८.४२ रूपये प्रति लीटर असून मुंबई (Mumbai) मध्ये पेट्रोल सध्या ११५.८५ रूपये आणि डिझेल १०६.६२ रूपये प्रतिलीटर इतके आहे. कोलकातामध्ये (Kolkata) पट्रोल आता ११०.४९ आणि डिझेल १०१.५६ रुपये प्रति लिटर आहे. याव्यतिरिक्त चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर १०६.६६ रुपये आणि डिझेल १०२.५९ रुपये प्रति लिटर आहे.

मागील जवळपास एक महिन्यापासून इंधन दर (fuel rate) सतत वाढता आहे. ऑक्टोबर महिन्यात २५ हून अधिक वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. दररोज ३० आणि ३५ पैसे दराने वाढ होऊन ऑक्टोबरमध्ये पेट्रोल ७.४५ रुपये महागलं आहे. तर डिझेल ७.९० रुपयांनी वाढलं आहे.

गेल्या दीड वर्षांपासून देशासह जगभरात करोनाचे (covid19) संकट होते. करोनामुळे लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला होता. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने, सर्वच उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी वाढली असून, दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कच्चे तेल महागल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com