Petrol Diesel Price : वाढत्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price : वाढत्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, जाणून घ्या आजचे दर

दिल्ली l Delhi

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची (Crude Oil Rate) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण उत्पादन कमी असल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे.

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike Today) दरात सलग पाचव्या दिवशी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेली जनता सततच्या इंधन दरवाढीमुळे आणखी त्रस्त झाली आहे. सततच्या महागाईमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी आता १०९.३४ रुपये मोजावे लागणार असून डिझेलचा दर ९८.०७ रुपयांवर पोहोचला आहे. तर मुंबईत पेट्रोल ११५.१५ हजार प्रती लीटरवर पोहोचलं आहे, डिझेलची प्रती लीटर किंमत १०६.२३ रुपये झाली आहे. कोलकत्त्यामध्ये पेट्रोलचा प्रती लीटर दर १०९.८० असून डिझेल १०१.१९ रुपये प्रती लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल प्रती लीटर १०६.०४ रुपये लीटर असून डिझेल १०२.२५ रुपये आहे.

ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५ दिवसांहून अधिक काळ वाढ झाली आहे. या महिन्यात पेट्रोल ७.४५ रुपयांनी तर डिझेल ७.९० रुपयांनी महागले आहे. दरम्यान, तेलाची मागणी आणि पुरवठा या मुद्द्यावर केंद्र सरकार अनेक तेल निर्यातदार देशांशी बोलणी करत आहे, मात्र किमतीत तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com