पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; नगर, नाशिकमधील एका लिटरचे दर काय?

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; नगर, नाशिकमधील एका लिटरचे दर काय?

दिल्ली l Delhi

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची (Crude Oil Rate) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण उत्पादन कमी असल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे.

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike Today) दरात आज पुन्हा वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेली जनता सततच्या इंधन दरवाढीमुळे आणखी त्रस्त झाली आहे. नवरात्रोत्सव सुरु आहे अशात दिवाळी देखील तोंडावर आली आहे. अशामध्ये सततच्या महागाईमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

आज पेट्रोलच्या किमतीत (Petrol price today) ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किमतीत (Diesel price today) ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशाच्या राजधानीसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढले आहेत.

देशातील २६ राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर १०० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या पार आहेत.

दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर १०४.७९ रुपये प्रति लीटर झाला आहे. तर डिझेल ९३.५२ रुपये प्रति लीटर दराने विकलं जात आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा नवा दर ११०.७५ रुपये प्रति लीटर झालं आहे. तर डिझेल १०१.४० रुपये प्रति लीटरने विकलं जात आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर (प्रतिलिटर रुपयांमध्ये)

पुणे : पेट्रोल - ११०.५०, डिझेल - ९९.६०

अहमदनगर : पेट्रोल - ११०.०८, डिझेल - ९९.१७

नाशिक : पेट्रोल - ११०.७८, डिझेल - ९९.८४

औरंगाबाद : पेट्रोल - १११.७४, डिझेल - १०२.३६

ठाणे : पेट्रोल - ११०.५५ डिझेल - १०१.१७

Related Stories

No stories found.