पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ

जाणून घ्या आजचे दर
पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ

दिल्ली l Delhi

मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सातत्याने कच्चा तेलाच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. गेल्या तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत.

आज, शनिवारी सरकारी तेल कंपन्यांनी , पेट्रोलच्या किंमती २४ पैशांनी तर डिझेलच्या दरात १५ पैशांनी वाढल्या आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वोच्च पातळीवर आहेत. आता दिल्लीत पेट्रोलची किंमत ९१.१७ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ८१.४७ रुपये झाली आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोलची किंमत ९७.५७ रुपये तर डिझेलची किंमत प्रति लिटर ८८.६० रुपयांवर पोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. कच्चे तेल ६६ डॉलर प्रती बॅरलच्या वर आहे तर डब्ल्यूटीआयचा दर ६३ डॉलरच्या वर आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर -

नवी दिल्ली - ९१.१७ रुपये प्रतिलिटर

मुंबई - ९७.४७ रुपये प्रतिलिटर

चेन्नई - ९३.१२रुपये प्रतिलिटर

नोएडा - ८९.३८ रुपये प्रतिलिटर

कोलकाता - ९१.३५ रुपये प्रतिलिटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली - ८१.४७ रुपये प्रतिलिटर

मुंबई - ८८.६० रुपये प्रतिलिटर

चेन्नई - ८६.४५ रुपये प्रतिलिटर

नोएडा - ८१.९१ रुपये प्रतिलिटर

कोलकाता - ८४.९५ रुपये प्रतिलिटर

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये उच्चांक दरवाढ झाल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. तर विरोधकांकडून देखील मोदी सरकारवर हल्ला चढवला जात आहे. मात्र दुसरीकडे, मोदी सरकारमधील मंत्र्यांची इंधन दरवाढीबाबतची वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे इंधन दरवाढ हे धर्मसंकट असल्याचे वक्तव्य चर्चेत असतानाच आता पेट्रोलियम मंत्र्यांनी अजब विधान केले आहे.

"आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढल्याने त्याची झळ सर्वसामान्य ग्राहकांना देखील बसत आहे. हिवाळा संपला की, दर थोडेफार कमी होईल. हा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. पेट्रोल-डिझेलची मागणी वाढल्याने किंमती वाढल्या. थंडीच्या मोसमात हे असं नेहमी होतं. पुढच्या काही दिवसांमध्ये किंमती कमी होतील", असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com