Petrol Diesel Price : नागरिकांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price : नागरिकांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

दिल्ली l Delhi

काही दिवसांपासून 'जैसे थे' असणारे पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहे. पेट्रोल डिझेलची किंमत सलग १८ दिवस स्थिर ठेवल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलची किंमत वाढविली आहे.

आज पेट्रोलच्या किंमतीत १५ पैसे तर डिझेलच्या किंमतीत २० पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. किंमती वाढल्यानंतर राजधानी दिल्लीत मंगळवारी पेट्रोल ९०.५५ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल ८०.९१ रुपये प्रति लीटरने विक्री केले जात आहे.

यापूर्वी ६६ दिवसांपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली नव्हती. मात्र निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर बहुतांश वेळा इंधनाच्या किंमती हलक्या स्वरुपात खाली आणल्या होत्या. तर गेल्या १६ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये कोणताच बदल केला नव्हता. अखेर १५ एप्रिलला पेट्रोल १६ पैसे प्रति लीटर आणि डिझेल १४ पैसे प्रति लीटर स्वस्त झाले होते. त्यानंतर किंमती सातत्याने स्थिर होत्या.

Title Name
Coronavirus : देशातील एकूण रुग्णसंख्या २ कोटींवर
Petrol Diesel Price : नागरिकांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली - पेट्रोल - ९०.५५ रुपये, डिझेल - ८०.९१ रुपये

मुंबई - पेट्रोल - ९६.९५ रुपये, डिझेल - ८७.९८ रुपये

चेन्नई - पेट्रोल - ९२.५५ रुपये, डिझेल - ८५.९० रुपये

कोलकाता - पेट्रोल - ९०.७६ रुपये, डिझेल - ८३.७८ रुपये

लखनौ - पेट्रोल - ८८.८४ रुपये, डिझेल - ८१.३१ रुपये

चंदीगढ - पेट्रोल - ८७.१५ रुपये, डिझेल ८०.९२ रुपये

या दोन महिन्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असूनही देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यामागे सहाजिकच पाच राज्यातील निवडणुका हे कारण होतं. मात्र जशा या निवडणुका संपल्या तसं लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. निवडणुका झाल्यानंतर आता होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की आहे. या पुढे आता रोज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं काही जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com