Petrol Disel Price : पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा वाढले, जाणून घ्या आजचे दर

Petrol Disel Price : पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा वाढले, जाणून घ्या आजचे दर

दिल्ली | Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ (Fuel Price Hike) होत आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलनं इतिहासात पहिल्यांदाच शंभरीपार मजल मारली आहे.

आज पेट्रोल ३५ पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) पेट्रोल १००.९१ रुपये प्रति लिटरनं तर डिझेल ८९.८८ रुपये प्रति लिटरने विकण्यात येत आहे. तर मुंबईत (Mumbai) पेट्रोलची किंमत आता १०६.५९ रुपयांवर गेली असून डिझेल ९७.४६ रुपये प्रति लिटरने विकण्यात येत आहे. कोलकात्यामध्ये (Kolkata) पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे १०१.०१ रुपये प्रति लिटर आणि ९२.९७ रुपये प्रति लिटर तर भोपाळमध्ये (Bhopal) १०९.२४ रुपये प्रति लिटर आणि ९८.६७ रुपये प्रति लिटर इतके नोंदवण्यात आले आहेत.

देशातील मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये १ लिटर पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे.

‘या’ राज्यांत पेट्रोलची शंभरी

देशातील १७ राज्यांमध्ये (राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश) १ लिटर पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, बिहार, केरळ, सिक्कीम, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये १ लिटर पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. जुलै महिन्यात पेट्रोल सहा वेळा आणि डिझेल चार वेळा महागले. याआधी जून आणि मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी १६ वेळा महागले.

एसटी (ST) प्रवासही महागणार?

दरम्यान, सतत होणारी डिझेल दरवाढ, करोनामुळे कमी झालेले प्रवासी उत्पन्न आणि महागाई भत्त्यासह अन्य खर्चात झालेली वाढ, यामुळेच एसटीवर आर्थिक भार वाढला आहे. परिणामी यावर तोडगा काढण्यासाठी एसटी प्रशासनानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. पुढील काही दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com