नवी दिल्ली -

देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरात रविवारी

जवळपास 30 पैशांची वाढ झाली. नवीन दरांनुसार दिल्लीत पेट्रोल 0.29 पैशांनी वाढून 88.73 रूपये लिटर पर्यंत पोहचले आहे. तर, डिझेलचे दर 0.32 पैशांनी वाढल्याने 79.06 रूपयांपर्यंत पोहचले आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलियमचे दर लागोपाठ वाढत आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई, कोलकाता तसेच दिल्लीत पेट्रोलचे दर लिटरमागे अनुक्रमे 95.21, 90.01 तसेच 88.73 रूपयांपर्यंत पोहचले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून सलग पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.