पेट्रोल, डिझेल महागले ! जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल, डिझेल महागले ! जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. आजही पेट्रोल 29 आणि डिझेल 34 पैशांनी महागले आहे. त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 92.34 रुपये इतकी झाली असून डिझेल प्रति लिटर 82.95 रुपयांना विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.11 रुपये प्रति लिटरला विकले जात आहे.

दरम्यान, मागील दोन महिने इंधनाचे दर स्थिर होते. मात्र 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधन दरवाढ पुन्हा सुरू झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी आजही इंधनाच्या किंमती वाढवल्या आहेत त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com