Petrol Diesel Price : डिझेलच्या दरात घट, पेट्रोलचा भाव काय?

Petrol Diesel Price : डिझेलच्या दरात घट, पेट्रोलचा भाव काय?

दिल्ली | Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ (Fuel Price Hike) होत होती. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Disel Rate Hike) सातत्याने वाढ झाल्यानंतर आता ही वाढ गेल्या ३१ दिवसांपासून स्थिरावली आहे.

Petrol Diesel Price : डिझेलच्या दरात घट, पेट्रोलचा भाव काय?
World Photography Day : तुम्हाला पण फोटोग्राफीची आवड आहे?, जाणून घ्या मोबाईल फोटोग्राफीसाठी बेस्ट टिप्स

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) ३१ दिवस स्थिर राहिल्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या (Diesel Price Today) किंमती उतरल्या आहत. गुरुवारी सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या (Diesel Price Today) किंमतीत कपात केली आहे. तर पेट्रोलचे दर (Petrol Price Today) जैसे थे आहेत.

दिल्लीत आज पेट्रोलची किंमत १०१.८४ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ८९.४७ रुपये प्रति लिटर इतकी आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७ ८३ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ९७.०४ रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईत आज पेट्रोलची किंमत १०१.४९ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ९४.२० रुपये प्रति लिटर इतकी आहे. चेन्नई, पंजाबसह देशातील अधिक भागांत पेट्रोलनं शंभरी ओलांडली असून अनेक शहरांत पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. अनेक शहरांत डिझेलनंही शंभरी गाठली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये यापूर्वीच पेट्रोलनं शंभरी ओलांडली आहे.

दरम्यान, या आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्याबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हटले की पाठीमागील सरकार पेट्रोल डिझेल दरात कपात करण्याचा विचार करत नाही. कारण हे सरकार या आधीच्या सरकारच्या ऑयल बॉन्ड्स च्या ओझ्याखाली दबलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com