पेट्रोल-डिझेल दरवाढ काही थांबेना! नगर, नाशिकसह राज्यातील प्रमुख शहरात काय आहेत दर?

पेट्रोल-डिझेल दरवाढ काही थांबेना! नगर, नाशिकसह राज्यातील प्रमुख शहरात काय आहेत दर?

दिल्ली l Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार (Unemployed) झाले आहेत.

त्यातच ऐनसणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरच्या (Gas cylinder) वाढत्या किंमतींमुळे सर्व सामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यातच आता पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) किंमतींमध्येही सतत भाववाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या किंमतीत आज प्रति लिटर ३५ पैशांनी वाढ केली आहे. पेट्रोलही ३० पैसे प्रति लिटर महाग झाले आहे.या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत १०४.४४ प्रति लीटरच्या नवीन उच्चतम पातळीवर पोहोचली आहे. मुंबईत ते ११०.४१ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर मुंबईत डिझेल आता १०१.०३ रुपये प्रति लीटर मिळत आहे. दिल्लीत डिझेलची किंमत ९३.१७ रुपये प्रति लीटर आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल १०५.०५ रुपये प्रति लीटर झाले आहे, तर डिझेल ९६.२४ रुपयांनी विकले जात आहे. दरम्यान, तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.७६ रुपये आणि डिझेल ९७.५६ रुपयांनी विकले जात आहे. सलग चार दिवस पेट्रोलच्या दरात ३० पैशांनी आणि डिझेलच्या किंमतीत ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर (प्रतिलिटर रुपयांमध्ये)

पुणे : पेट्रोल - ११०.५१, डिझेल - ९९.५७

अहमदनगर : पेट्रोल - १०९.९९, डिझेल - ९९.००

नाशिक : पेट्रोल - ११०.४६, डिझेल - ९९.५३

नाशिक : पेट्रोल - ११०.४६, डिझेल - ९९.५३

औरंगाबाद : पेट्रोल - ११०.65, डिझेल - ९९.७१

ठाणे : पेट्रोल - १०९.८७ डिझेल - ९८.९४

जळगाव : पेट्रोल - १११.२२ डिझेल -१००.२९

कोल्हापूर : पेट्रोल - ११०.०९ डिझेल - ९९.१९

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशात वाहनांच्या इंधनाचे दर वाढत आहेत. गेल्या काही दिवसात भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलाची सरासरी किंमत ७८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलने १००रुपये प्रति लीटरचा टप्पा ओलांडला आहे. राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फरक कर आणि केंद्र आणि राज्य सरकारने लादलेल्या वाहतुकीच्या किंमतीमुळे बदलतो.

Related Stories

No stories found.