सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

घरगुती सिलेंडरच्या दरातही वाढ
सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

दिल्ली l Delhi

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या किंमतीने आपली भाववाढीची घोडदौड सलग सातव्या दिवशीही कायम ठेवली आहे. तसेच घरगुती सिलेंडरच्या दरातही ५० रुपयांची वाढ झाली आहे.

आज (सोमवार) देशभरात पेट्रोल २९ पैसे तर डिझेल ३२ पैशांनी महागले आहे. आजच्या दरवाढीनंतर दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८८.९९ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७९.३५ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९१.१९ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८४.४४ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९०.२५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८२.९४ रुपये झाला आहे.बंगळुरात पेट्रोल ९१.९७ रुपये असून डिझेल ८४.१२ रुपये झाला आहे.

मुंबईत पेट्रोलचा भाव ९५.४६ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८६.३४ रुपये मोजावे लागतील. राज्यात परभणीमध्ये पॉवर पेट्रोलचा भाव १००.१६ रुपये झाला आहे. तर साध पेट्रोल सर्वाधिक ९७.४५ रुपये आहे. परभणीत एक लिटर डिझेलचा भाव ८६.९५ रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे इंधन दरवाढ होताना दिसत आहे. कच्च्या तेलाची किंमत ६२ रूपये प्रति बॅरेल आहे. मात्र कच्च्या तेलाची किंमत पुन्हा कमी होऊ शकते, ज्यामुळे इंधनांच्या किंमतीतही घसरण होण्याची शक्यता वर्तवला जात आहे. मात्र सध्याच्या स्थितीत पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांचा खिसा रिकामा होताना दिसतोय. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने इतर जीवनावश्यक वस्तूच्या किमतीतही वाढ होताना दिसते.

घरगुती सिलेंडरच्या दरातही वाढ

दरम्यान, घरगुती सिलेंडरच्या दरातही ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानित सिलेंडरसाठी आता जवळपास ७६९ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी १४.२ किलो LPG सिलेंडर गॅसची किंमत ७१९ रुपये इतकी होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात LPG सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. ऐकीकडे LPG सिलेंडरचे दर सतत वाढत आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकारने आर्थिकवर्ष २०२२ साठी पेट्रोलियम सब्सिडी हटवून १२ हजार ९९५ करोड रूपये केले आहेत. दरम्यान केंद्र सरकार लवकरच LPG सिलेंडरवरील सब्सिडी रद्द करेल असा अंदाज वर्तवण्यात आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या विक्रीवर सरकारकडून अनुदान मिळते अनुदानात मिळणारी ही रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होते. घरगुती सिलेंडरच्या या वाढलेल्या किंमतीमुळे सामान्य गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com