सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

जाणून घ्या आजचे दर
सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

दिल्ली l Delhi

देशात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

दिल्लीत पेट्रोलची किंमत ८८.४४ रुपये तर डिझेल ७८.७४ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कोलकाता म्ध्ये ८९.७३ रुपये पेट्रोल तर ८१.९६ रुपये डिझेल असे दर आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल ९०.७० रुपये आणि डिझेल ८३.५२ रुपयांनी विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल ९४.९३ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर प्रति लिटर ८५.७० रुपये इतका झाला आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ९५ रुपयांच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत आणखी वाढ झाल्यास पेट्रोलची किंमत १०० रुपयांचा आकडा गाठेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर अधिक आहेत.

दरम्यान, कच्च्या तेलाच्या बाजारातील जगातील सर्वात मोठा आयातदार असलेल्या चीनने या तेलाची मागणी बेसुमार वाढवली आहे. यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. काल ब्रेंट क्रूड ६२ डॉलर प्रति बॅरलच्याही पलीकडे गेले. करोनाच्या प्रकोपाच्या काळातच फक्त ही किंमत इतकी चढी होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com