Petrol-Diesel Price : जुलै महिन्यात नव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ, डिझेल 'जैसे थे'!

Petrol-Diesel Price : जुलै महिन्यात नव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ, डिझेल 'जैसे थे'!

जाणून घ्या आजचा दर

दिल्ली l Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार (Unemployed) झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ (Fuel price hike) होत आहे.

दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी (petroleum companies) आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ (Petrol price hike) केल्याचं दिसत आहे. मात्र डिझेलच्या दरामध्ये (Disel rate) काहीही बदल करण्यात आलेले नाही. डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहे. राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) आज पेट्रोल ३० पैसे प्रतिलिटरने महागले तर मुंबईमधील (Mumbai) पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी वाढ झालीय.

दिल्लीतील (Delhi) पेट्रोलचा प्रति लिटर दर १०१.८४ रुपये आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल १०७.८३ रुपये तर डिझेल ९७.४५ रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. भोपाळमध्ये (Bhopal) पेट्रोलची किंमत ११०.२५ रुपयांवर तर डिझेल ९८.६७ रुपयांवर पोहोचली आहे. कोलकात्यात (Kolkata) पेट्रोलचा दर १०२.०८ रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत ९३.०२ रुपये प्रति लीटर आहे.

राजस्थानमधील गंगानगर (Rajsthan Ganganagar) आणि मध्यप्रदेशमधील अनुपपूर (Madhyapradesh Anupur) या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा दर देशात सर्वाधिक आहे. गंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर ११३.२१ रुपये प्रति लीटर आणि एक लिटर डिझेलचा दर १०३.१५ रुपये प्रति लीटर आहे. तर अनुपपूरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर ११२.७८ रुपये प्रति लीटर आणि एक लिटर डिझेलचा दर १०१.१५ रुपये प्रति लीटर आहे.

जुलै (July) महिन्यात नवव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली. डिझेलच्या किंमती जुलै महिन्यात पाचवेळा वाढल्या. एकदा डिझेलच्या किंमतीत घट झाली. जून आणि मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी १६ वेळा वाढ झाली. दरवाढीची सुरुवात ४ मे २०२१ पासून झाली. याआधी पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होती त्या काळात तब्बल १८ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com