इंधन दरवाढीचा भडका; जाणून आपल्या शहारातील पेट्रोल-डिझेलचे दर

इंधन दरवाढीचा भडका; जाणून आपल्या शहारातील पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली l Delhi

देशात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ होत आहे. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचं दिसत आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये अनुक्रमे २५ आणि १३ पैशांनी वाढ झाली आहे. ही वाढ प्रति लीटरच्या दरांमध्ये झाली. यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल १०२ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.८४ रुपयांवर पोहोचले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल ९६.६६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८७.४१ रुपये प्रति लिटरवर पोहोचले. देशात सर्वाधिक राजस्थानमध्ये पेट्रोलसाठी १०७.७९ रुपये प्रति लिटर इतका दर आहे. तसंच इथं डिझेलने शंभरी पार केली असून १००.५१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागत आहेत. मध्य प्रदेशातही पेट्रोल १०७.४३ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९८.४३ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

दरम्यान महाराष्ट्रात परभणीमध्ये पेट्रोलचे दर १०५.१५ रुपये आणि डिझेलचे दर ९५.६३ रुपयांपर्यंत पोहचलेत. नागपूरमध्ये पेट्रोल मुंबईप्रमाणेच १०२ रुपयांहून अधिक किंमतीला मिळत आहे. नांदेडमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी जवळजवळ १०५ रुपये मोजावे लागत आहेत. बीड, जालना, सिंधुदुर्ग, यवतमाळमध्येही पेट्रोलचे दर १०४ रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक आहेत. अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, वर्धा, वाशिममध्ये एका लिटर पेट्रोलसाठी १०३ रुपयांपेक्षा अधिक किंमत मोजावी लागत आहे. मुंबईसोबतच अकोला, चंद्रपुर, धुळे, नवी मुंबई, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सांगली, ठाण्यात पेट्रोलचे दर १०२ रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com