विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास केंद्राची परवानगी
देश-विदेश

विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास केंद्राची परवानगी

केंद्रीय गृहमंत्रालयाचं शिक्षण विभागाला पत्र, राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली - विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या कोविड-19 च्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था अंतिम परीक्षा घेऊ शकतात, असं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना लिहिलेल्या पत्रात गृह मंत्रालयाने आज विद्यापीठे आणि संस्थांना परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने आता केंद्र सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

गृहमंत्रालयाने लागू केलेल्या पत्रानुसार अंतिम सेमिस्टरची परीक्षा सक्तीची असेल आणि यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही परीक्षा घेण्यात येईल. तसेच आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) चेही पालन केले जाईल. राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे राज्य सरकारने विद्यापीठातील पदवीच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने आता केंद्र सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान दहा दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देत व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या, सेमीस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आता केंद्र सरकारने या निर्णयामुळे ठाकरे सरकारच्या निर्णयाला दणका दिला आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षांसंदर्भात थेट केंद्रानेच आदेश दिल्याने या परीक्षा आता विद्यापीठांना घ्याव्याच लागणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com