‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन करण्याची सिरम इन्स्टिट्यूटला परवानगी

‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन करण्याची सिरम इन्स्टिट्यूटला परवानगी

पुणे(प्रतिनिधि)

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रशियाच्या करोनावरील ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन करण्याची परवानगी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला मिळाली आहे. काही अटींवर ही परवानगी दिली गेल्याचे समजते.

या लसीची निर्मिती पुणे येथील सीरम ही संस्था करणारा आहे. स्टुटनिक व्ही ही लस निर्मितीची परवानगी मिळावी यासासाठी सीरम संस्थेचे काही दिवसांपासून प्रयत्न चालले होते. त्या प्रयत्नांना आता यश आले आहे. काही नियम आणि अटींच्या आधारे, 'डीसीजीआई'ने सीरम संस्थेला भारतात स्पुटनिक व्ही लस बनवण्याची परवानगी दिली आहे.भारतात सध्या डॉ. रेड्डीज मध्ये स्पुटनिकचे उत्पादन होत आहे.

'गमलेया रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायेलॉजी'सोबत भागेदारीसीरम संस्था या अगोदर कोविड लसची निर्मिती करत होती. त्याच संस्थेने आता रशियामध्ये निर्मिती करण्यात येणारी स्पुटनिक व्ही लस निर्मिती करण्याची परवानगी मिळवली आहे. यासाठी सीरमने औषध महानियंत्रक मंडळाकडे परवानगी मागीतली होती.

सीरम ही संस्था पुणे येथील हडपसरमधील आपल्या संस्थेत ही स्पुटनिक व्ही या लसीची निर्मिती करणार आहे. तसेच, निर्मितीमध्ये मॉस्को येथील 'गमलेया रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायेलॉजी' ही संस्था आणि सीरम हे लस निर्मितीचे सोबत काम करणारा आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com