
दिल्ली | Delhi
रामदेव बाबा यांनी करोनावर पुन्हा एक नवं औषध लॉन्च केलं आहे
शुक्रवारी (१९ फेब्रुवारी २०२१) एका पत्रकार परिषदेत रामदेव बाबा यांनी हे औषध लॉन्च केलं. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते.
त्यानंतर पतंजलीने 'कोरोनिल' या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमाणपत्र मिळाल्याचे जाहिर केले. मात्र त्यानंतर WHO ने ट्विट करत म्हंटले आहे की, 'कोविड 19 च्या उपचारांसाठी अशा कोणत्याही पारंपारिक औषधाचे परीक्षण केले नाही किंवा प्रमाणपत्रही दिलेले नाही.' याबाबत डब्ल्यूएचओनेही स्पष्टीकरण जारी केले आहे. मात्र WHO पतंजलीच्या कोरोनिलचे नाव घेतलेले नाही.
याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) देखील रामदेव बाबांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला.