Monsoon Session : पेगॅससवरुन गदारोळ; TMC च्या सहा खासदारांचं निलंबन

Monsoon Session : पेगॅससवरुन गदारोळ; TMC च्या सहा खासदारांचं निलंबन

दिल्ली | Delhi

१९ जुलै पासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Monsoon Session) सरुवात झाली आहे. पण, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून पेगॅसस हेरगिरी (Pegasus snooping row), करोना (COVID19) आणि कृषी कायद्यावरुन (Farm Laws) संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक प्रचंड गदारोळ घालत आहेत. यामुळे अनेकदा दोन्ही सभागृहाची कार्यवाही स्थगित करावी लागली आहे.

दरम्यान, आज राज्यसभेच्या (Rajya Sabha) अधिवेशनात काही खासदारांनी (MP) वेलमध्ये उतरुन घोषणा दिल्या तसेच गोंधळ निर्माण करण्याचा प्रकार घडला. यावरून राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी (Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu) गोंधळ घालणाऱ्या खासदारांना तत्काळ निलंबित केले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आज सकाळी राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाले. सभागृहात सर्वजण एकत्रित आले. त्यावेळी राज्यसभेच्या अधिवेशनाचे काम सुरु करणार तो सभागृहात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी (TMC MP) एकत्रित येत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी शांत राहण्याचे आवाहनही केले. मात्र, संबंधित खासदारांनी काहीही न ऐकल्याने अखेर राज्यसभेत गोंधळ निर्माण करणाऱ्या सहा खासदारांना निलंबित करण्यात आले.

डोला सेन (Dola Sen), मोहम्मद नदिमुल हक (Nadimul Haque), अबीर रंजन बिस्वास (Abir Ranjan Biswas), शांता छेत्री (Shanta Chhetri), अर्पिता घोष (Arpita Ghosh) आणि मौसम नूर (Mausam Noor) यांना राज्यसभेच्या अध्यक्षांनी सभागृहातील वेलमध्ये प्रवेश करणे, फलक लावणे आणि नियम २५५ अंतर्गत खुर्चीची अपमान केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं आहे. हे सर्व तृणमूल खासदार पेगॅसस वादावर गोंधळ निर्माण करत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com