Parliament Monsoon Session : पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Parliament Monsoon Session : पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

दिल्ली l Delhi

संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) सोमवारपासून (१९ जुलै) सुरू होत आहे. याआधी १८ जुलै म्हणजेच आज एक बैठक होणार आहे.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे ((Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi)). ही बैठक सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान या बैठकीसाठी शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत (sanjay Raut) आणि विनायक राऊत (Vinayak Raut) उपस्थित राहणार आहे. यावेळी मराठा व ओबीसी आरक्षणाचा (Maratha and OBC Reservation) मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती मिळत आहे.

सोमवारपासन सुरू होणारे अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यादरम्यान, विरोधक महागाई, तेलाच्या वाढत्या किमती, करोना लसींचा अभाव, शेतकरी आंदोलन, राफेल करार, भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षा मुद्दय़ांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर या अधिवेशनात तीन अध्यादेशांसह एकूण २३ विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यापैकी १७ नवीन विधेयकं आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com