संसद अधिवेशन : करोनामुळे ‘हे’ मोठे बदल
देश-विदेश

संसद अधिवेशन : करोनामुळे ‘हे’ मोठे बदल

दोन्ही सदनांचे चेंबर आणि गॅलरीमध्ये बदल

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

करोना संकट असतानाच येत्या काही दिवसांमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यसभा सचिवालय संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी या महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी सर्व तयारी ऑगस्ट महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी संसदेच्या इतिहासातले काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. Parliament Monsoon Session Big changes due to Coronavirus crisis

करोना विषाणूच्या संकटात संसदेचं कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावं यासाठी राज्यसभेच्या चेंबरमध्ये 4 मोठे स्क्रिन लावण्यात आले आहेत. तर राज्यसभेच्या गॅलरीमध्ये 1 मोठा आणि 4 छोटे स्क्रिन लावण्याचं काम सुरू आहे. याव्यतिरिक्त गॅलरीमध्ये ऑडिओ कंसोल आणि अल्ट्राव्हॉयलेट जंतूनाशक रेडिएशनचा वापर केला जात आहे. संसदेच्या इतिहासात पहिल्यांना दोन्ही सदनं जोडली जात आहे. तसंच यासाठी ऑडिओ व्हिज्युअल सिग्नलच्या प्रसारणासाठी दोन्ही सदनांना जोडणारी विशेष केबलही लावण्यात येत आहे.

याव्यतिरिक्त चेंबरला गॅलरीपासून वेगळं करण्यासाठी पॉली कार्बोनेट शीटचा वापर करण्यात येत आहे. 1952 नंतर संसदेच्या इतिहासात असं पहिल्यांदा होत आहे जेव्हा संसदेच्या अधिवेशनासाठी दोन्ही सदनांच्या चेंबर आणि गॅलरींचा वापर करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करता यावं यासाठी अशा प्रकारच्या विशेष योजना तयार करण्यात येत आहेत.

राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निरनिराळ्या पर्यायांच्या पडताळणीनंतर पावसाळी अधिवेशनासाठी दोन्ही सदनांचे चेंबर आणि गॅलरीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्यसभेच्या 60 सदस्यांना राज्यसभेच्या चेंबर आणि 51 सदस्यांना राज्यसभेच्या गॅलरीत बसवण्यात येणार आहे. तर बाकी 132 सदस्य लोकसभेच्या चेंबर्समध्ये बसतील.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com