'पनामा'नंतर ‘पँडोरा पेपर्स’लीक ; 'या' नामवंत भारतीयांची परदेशांत गुप्त गुंतवणूक?

'पनामा'नंतर ‘पँडोरा पेपर्स’लीक ; 'या' नामवंत भारतीयांची परदेशांत गुप्त गुंतवणूक?

दिल्ली | Delhi

जगभरात गाजलेल्या पनामा पेपर्स लीक प्रकरणानंतर आता जगातील धनाढ्यांना परदेशात केलेली गुंतवणूक उघड करणारी कागदपत्रे समोर आली आहेत. जगभरातील मातब्बर राजकारणी, धनाढ्य उद्योगपती आणि सेलिब्रीटीजनी कर चोरी करण्यासाठी काही देशांमध्ये अवैध गुप्त गुंतवणूक केल्याची माहिती पँडोरा पेपर्स लीकमधून समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

जगभरातून ११९ कोटी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा 'आर्थिक गैरव्यवहार' जगासमोर उघड झाला आहे. ११७ देशांतील ६०० पत्रकार 'पेंडोरा पेपर लीक'च्या तपासात सहभागी होते, असे 'आयसीआयजे'ने सांगितले. एक इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ब्रिटनच्या न्यायालयात आपण दिवाळखोर असल्याचा दावा करणाऱ्या उद्योगपतीच्या परदेशात १८ कंपन्या आहेत.

या यादीतील ३०० पेक्षा जास्त भारतीय नावांपैकी ६० जणांविरुद्ध पुरावे तपासण्यात आले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यामध्ये माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी, नीरा राडिया, गांधी कुटुंबीयांचे निष्ठावान दिवंगत सतीश शर्मा आदींचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत हे उघड होतील. या लोकांनी करचुकवेगिरीसाठी सामोआ, बेलीज, कुक बेटांपासून ते ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि पनामापर्यंत आश्रय घेतला आहे.

पँडोरा पेपर लीक म्हणजे काय?

जगभरातील तब्बल १२ दशलक्ष कागदपत्रे दिवसरात्र तपासल्यावर जगभरातील पैशांचे व्यवहार आणि गैरव्यवहार याबद्दल मोठा खुलासा पँडोरा पेपर लीकच्या माध्यमातून होतो. ही एक अशी लीक आहे, जी जगातील काही श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांनी लपवलेली संपत्ती, कर चुकवण्याच्या पद्धती, मनी लाँड्रिंग यांचा भंडाफोड करते. ११७ देशांतील ६०० हून अधिक पत्रकार आणि १४० माध्यम संस्थांनी अनेक महिने सतत काम केले आणि १४ वेगवेगळ्या स्रोतांकडून कागदपत्रे शोधताना सर्व खुलासे केले. हा खुलासा इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्सने केला आहे, जो जगातील सर्वात मोठा खुलासा असल्याचे मानले जाते.

Related Stories

No stories found.