पुलवामात सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह तिघांचा खात्मा

पुलवामात सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह तिघांचा खात्मा
File Photo

दिल्ली |Delhi

काश्मीर (Kashmir) खोऱ्यातील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री दहशतवाद्यांसह सुरु झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाला (Indian Army) मोठे यश मिळाले आहे.

मोठ्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी लष्कर- ए- तोयबाच्या कमांडर एजाज उर्फ अबू हुरैराचा (Pakistani LeT commander Aijaz Abu Huraira) खात्मा केला आहे. याशिवाय दोन स्थानिक दहशतवाद्यांना मारण्याच यश आलं आहे.

काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा जवानांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आणि काही सामग्री जप्त करण्यात आली आहे. दरम्यान चकमकीनंतर पुलवामा शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

File Photo
Corona Update : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत चढउतार सुरु, महाराष्ट्रातील स्थिती काय?

पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखील पोलीस दलाला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर संयुक्त कारवाई करत परिसर सील केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती. यावेळी तीन दहशतवादी ठार करण्यात आले.

दरम्यान या आधी ८ जुलै रोजी पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दोन अतिरेक्यांना ठार केलं. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानी याला ठार करून पाच वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात काही भाग बंद ठेवण्यात आले होते. त्याच दिवशी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली होती. यावेळी सुरक्षा दलाने दोन अतिरेक्यांना ठार केलं.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com