देशात गेल्या २४ तासांत ८६ हजाराच्यावर नव्या रुग्णांची नोंद

तर ९ लाखाच्यावर रुग्णांवर उपचार सुरु
देशात गेल्या २४ तासांत ८६ हजाराच्यावर नव्या रुग्णांची नोंद

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात ८६ हजाराच्या वर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

गेल्या २४ तासात १ हजार १४१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ८६ हजार ०५२ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ५८ लाख १८ हजार ५७१ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ४७ लाख ५६ हजार १६५ रूग्ण करोनामुक्त झाले असून ९ लाख ७० हजार ११६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत ९२हजार २९० रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासात १३ लाखापेक्षा जास्त चाचण्या

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोना चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात १३ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहे. दिवसभरात १३ लाख ८० हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com