देशात १० लाखांच्यावर रुग्णांवर उपचार सुरू

गेल्या २४ तासात देशात ८६ हजाराच्या वर रूग्ण
देशात १० लाखांच्यावर रुग्णांवर उपचार सुरू

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात ८६ हजाराच्या वर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

गेल्या २४ तासात १ हजार १३० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ८६ हजार ९६१ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ५४ लाख ८७ हजार ५८१ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ४३ लाख ९६ हजार ३९९ रूग्ण करोनामुक्त झाले असून १० लाख ०३ हजार २९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत ८७ हजार ८८२ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासात ७ लाखापेक्षा जास्त चाचण्या

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ६ कोटी ४३ लाख ९२ हजार ५९४ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी रविवारी ०७ लाख ३१ हजार ५३४ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

जगात करोना बाधितांची संख्या ३ कोटीच्या पार गेली आहे. तर मृतांचा आकडा ९ लाखांच्या पार गेला आहे. जगभरात आतापर्यंत ३ कोटी १२ लाख ३७ हजार ५३९ रुग्ण आढळले असून ९ लाख ६५ हजार ०६५ रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत २ कोटी २८ लाख २९ हजार ६७८ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. करोना बाधितांचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत दुस-या स्थानावर आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण बरे होण्याच्या यादीत भारत अव्वल स्थानावर असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com