लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी अनिवार्य नाही

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी अनिवार्य नाही

नवी दिल्ली - करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आता कोविन अ‍ॅपवर नोंदणी करण्याची गरज नाही. आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन लोक ऑन दी स्पॉट लस घेऊ शकतात अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे, आता कोरोना लसीकरणासाठी आधी रजिस्ट्रेशन करुन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. 18 वर्षांवरील नागरिक आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करुन लस घेऊ शकतात. सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि मोबाईल इंटरनेट न वापरणार्‍या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

कोरोना लसीकरणासाठी आधी कोविन अ‍ॅपवर नोंदणी अनिवार्य होती. यावर सुप्रीम कोर्टाने प्रश्‍न उपस्थित करत केंद्र सरकारला फटकारले होते.

लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी अनिवार्य नाही
एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार

आतापर्यंत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 27 कोटी 28 लाख 31 हजार 900 लसींचा मोफत पुरवठा केंद्र सरकारकडून तसेच राज्यांना थेट खरेदी सुविधेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यापैकी, राज्यांनी एकूण 25 कोटी 45 लाख 45 हजार 692 लसींच्या मात्रांचा वापर केला आहे. ही आकडेवारी आज सकाळी आठ वाजताच्या प्राथमिक आकड्यांवर आधारित आहे. 1 कोटी 82 लाख 86 हजार 208) लसींच्या मात्रा अद्याप राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असून त्या देण्याचे काम सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com