दुबईत भारतीय करोना रुग्णाचे एक कोटीचे बिल  माफ
देश-विदेश

दुबईत भारतीय करोना रुग्णाचे एक कोटीचे बिल माफ

80 दिवस उपचार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली - राजेश ओडनाला (42 वर्षे) या भारतीय नागरिकाला दुबईत करोनाची लागण झाली आणि त्याला खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आणि 80 दिवसांच्या उपचारानंतर तो बरा झाला, परंतु सुटीच्या वेळी त्याच्या हातात तब्बल 1 कोटी 52 लाख रुपयांचे बिल देण्यात आले, मात्र भारतीय राजदूताच्या मध्यस्थीमुळे रुग्णालयाने माणुसकीच्या नात्याने त्याचे एक कोटीचे देयक माफ केले. तो मूळ तेलंगणातील जगतियाल जिल्ह्याचा रहिवासी आहे.

23 एप्रिल रोजी राजेश यांची प्रकृती बिघडली. राजेश यांना गल्फ वर्कर प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष गुंडेल्ली नरिंसहा यांनी रुग्णालयात दाखल केले होते. या वाढीव देयकाबाबत नरिंसहा यांनी भारतीय राजदूत हरजितिंसग यांना याची कल्पना दिली.

हरजित सिंग यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला पत्र लिहून मानवतेच्या दृष्टीने निर्णय घेत देयक माफ करण्याची विनंती केली. रुग्णालय प्रशासनाने देयक तर माफ केलेच, शिवाय राजेश व त्यांच्या सहकार्‍याला हैदराबादला पाठवण्याची व्यवस्था केली व खर्चासाठी 10 हजार रुपये दिलेत. राजेश 14 जुलै रोजी एअर इंडियांच्या विमानाने भारतात परतले.

Deshdoot
www.deshdoot.com