Indian Air Force च्या ८९ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी अभिनंदन करत शेअर केले काही खास फोटो

Indian Air Force च्या ८९ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी अभिनंदन करत शेअर केले काही खास फोटो

दिल्ली | Delhi

भारत आज हवाई दलाचा ८९ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. भारतीय हवाई दलाची स्थापना याच दिवशी १९३२ मध्ये झाली. स्थापनेपासून भारतीय हवाई दलाने विविध युद्धे आणि मोहिमांमध्ये भाग घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करत काही खास फोटो शेअर करत त्यांच्या धैर्याला सलाम केला आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की, हवाई योद्ध्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना भारतीय हवाई दल वर्धापनदिनाच्या सदिच्छा. भारतीय हवाई दल म्हणजे धैर्य, परिश्रम आणि अचूकता होय. त्यांनी आव्हानांच्या काळात मानवतावादी भावनेतून देशाचे रक्षण करण्यासाठी स्वतःला वाहून दिलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही हवाई दल दिनानिमित्त हवाई योद्धे, माजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देत म्हंटल आहे कि, या राष्ट्राला भारतीय हवाई दलाचा अभिमान आहे. ज्यांनी शांतता आणि युद्धाच्या वेळी आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहे. मला खात्री आहे की भारतीय वायुसेना उत्कृष्टतेचे आदरणीय मानदंड कायम ठेवेल.

Related Stories

No stories found.