Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघातानंतर घटनास्थळी परिस्थिती काय? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघातानंतर घटनास्थळी परिस्थिती काय? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

दिल्ली | Delhi

शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कोरोमंडल एक्सप्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यात भीषण टक्कर झाली. या अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहे.

कोरोमंडल एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील शालीमार स्टेशन आणि चेन्नई दरम्यान धावते. यशवंतपूरहून येणाऱ्या दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनला त्याची धडक बसली. त्याचे अनेक डबे रुळावरून घसरले. यानंतर समोरून येणाऱ्या मालगाडीलाही धडक दिली. रेल्वेचा अपघात झाल्यानंतर बचाव कार्य सुरू आहे.

Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघातानंतर घटनास्थळी परिस्थिती काय? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर
सलमान खान ते चिरंजीवी... रेल्वे अपघातातवर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त! चाहत्यांना मदतीचं आवाहन..

रेल्वेत अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर, रुग्णालयात रक्तदान करण्यासाठीही नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशातच या रेल्वे अपघाताचा ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अंगावर शहारे आणणारा आहे. हा व्हिडीओमध्ये दिसेल तर गाड्यांचे कोच उस्ताव्यस्थ झाले आहेत. अक्षरश: चुराडा झाला आहे.

Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघातानंतर घटनास्थळी परिस्थिती काय? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर
भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस झाली पलटी, २६ जण जखमी

या व्हिडीओमधून अपघात किती भयंकर असू शकतो याचा अंदाज तुम्ही लावू शकता. बालासोरच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर टक्कर झाली. अपघातामध्ये एकूण १५ डबे रुळावरून घसरले, तर ७ डबे उलटले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रेनचे ४ डबे रेल्वे बाऊंड्रीच्याही बाहेर गेले.

ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी दुःख व्यक्त केले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक भूवनेश्वरमध्ये विशेष आयुक्तांकडून नियंत्रण कक्षातून दुर्घटनेच्या स्थितीवर माहिती घेत आहेत. मृतकांचा आकडा वाढत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली.

रेल्वे अपघात ग्रस्तांना मदतीसाठी भारतीय वायुसेनेची मदत घेतली जात आहे. मृतकांच्या कुटुंबीयांना प्रत्येक दहा लाख रुपयांची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे. तसेच गंभीर जखमींना दोन लाख रुपये तसेच किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे.

हेल्पलाइन नंबर

रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. यात हावडा स्टेशन 033 26382217, खडगपूर हेल्पलाईन नंबर 8972073925/9332392339, बालासोर हेल्पलाइन नंबर – 8249591559/7978418322 आणि शालीमार हेल्पलाइन नंबर 9903370746 जारी करण्यात आले. चेन्नई सेंट्रलच्या वतीने हेल्पलाइन नंबर्स जारी करण्यात आले. प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष बूथ सुरू करण्यात आले. या नंबर्सवर संपर्क साधता येईल. – 044- 25330952, 044-25330953 आणि 044-25354771.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हेल्पलाईन नंबर जारी केले. हे नंबर्स असे आहेत. – 033- 22143526/ 22535185.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com