नूपुर शर्माला सर्वोच्च दिलासा; कोर्टाने दिले 'हे' आदेश

नूपुर शर्माला सर्वोच्च दिलासा; कोर्टाने दिले 'हे' आदेश

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी नूपुर शर्माला (Nupur Sharma) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने (Court) तिच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे...

या प्रकरणाची पुढील सुनावणीही याच दिवशी निश्चित केली आहे. न्यायालयाने (Court) केंद्र आणि राज्यांना नोटिसा (Notice) बजावल्या आहेत जिथे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

नूपुर शर्माला सर्वोच्च दिलासा; कोर्टाने दिले 'हे' आदेश
...अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

नोटीसमध्ये न्यायालयाने (Supreme Court) राज्ये आणि केंद्र सरकारला विचारले आहे की, नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावर दाखल झालेले गुन्हे एका ठिकाणी हस्तांतरित का केले जाऊ नयेत. राज्ये आणि केंद्राच्या उत्तरानंतर न्यायालयाकडून (Court) खटल्यांच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला जाईल, असे मानले जात आहे.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले की, आम्ही आमच्या पूर्वीच्या आदेशात थोडी सुधारणा करतो. तुम्ही प्रत्येक कोर्टात जावे असे आम्हाला वाटत नाही.

नूपुर शर्माला सर्वोच्च दिलासा; कोर्टाने दिले 'हे' आदेश
पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा 'मास्टर प्लॅन'; घेतला 'हा' निर्णय

नूपुर शर्माने दाखल केलेल्या याचिकेत वेगवेगळ्या ठिकाणी ९ एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले आहेत. यांची एकाच ठिकाणी बदली करण्यात यावी जेणेकरून देशातील विविध शहरात जावे लागू नये.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com