देशातील करोनाबाधितांची संख्या 29 लाखांच्या पुढे !
देश-विदेश

देशातील करोनाबाधितांची संख्या 29 लाखांच्या पुढे !

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशात चाचण्या अधिक होत असल्यामुळे नव्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

गेल्या २४ तासांमध्ये देशात ६८ हजार ८९८ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात ९८३ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने २९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या २९ लाख ०५ हजार ८२४ इतकी झाली आहे. आतापर्यंतस २१ लाख ५८ हजार ९४७ रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत ५४ हजार ८४९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com