आता तिकीट कॅन्सल न करताच बदलता येणार प्रवासाची तारीख

रेल्वे
रेल्वे

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

रेल्वे (Railway) प्रवास करणारे नागरिक अनेकदा ट्रेनचे रिझर्वेशन (Reservation) करतात. मात्र काही कारणास्तव त्यांचा प्लॅन बदलतो आणि प्रवासाची तारीख पुढे-मागे सरकते. यावेळी तिकीट कॅन्सल करण्याशिवाय पर्याय उरत नाही. तिकीट कॅन्सल केल्याने प्रवाशांचे पैसे कट होतात. परंतु आता रेल्वेने यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे...

रेल्वेच्या नवीन नियमानुसार आता तुम्ही तुमचा प्रवास 'Preponed' किंवा 'Postponed' करू शकता. तसेचे तुमचे बोर्डिंग स्टेशनदेखील बदलण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करण्यात आला आहे.

प्रवासी मूळ बोर्डिंग स्टेशनच्या (Boarding station) स्टेशन मॅनेजरला (Station Manager) लेखी अर्ज (Written application) देऊन किंवा ट्रेन सुटण्याआधी कमीत-कमी 24 तासांच्या आधी एखाद्या कॉम्पुटराइज्ड रिझर्वेशन सेंटरवर (Computerized Reservation Center) जाऊन प्रवासाच्या बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करू शकतात. ही सुविधा ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही प्रकारच्या तिकीटांवर मिळते.

तुम्ही ज्या स्टेशनपर्यंत तिकीट बुक केले गेले आहे, त्यापुढील स्टेशनपर्यंत तुम्हाला जायचे असल्यास बुक केलेला प्रवास पूर्ण झाल्यानंतर तिकीट तपासणी कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा लागतो आणि त्यांना प्रवासाचे डिटेल्स द्यावे लागतात.

स्टेशन काउंटरवर बुक केलेल्या तिकीटाच्या प्रवासाची तारीख 'Preponed' किंवा 'Postponed' केवळ एकदाच करता येते. सीट कन्फर्म (Seat confirmed) किंवा वेटिंगवर (Waiting) असल्यासदेखील हे बदल करता येतात.

प्रवासाच्या तारखेत बदल करण्यासाठी, तारीख पुढे करण्यासाठी प्रवाशाला रिझर्वेशन ऑफिस जाऊन ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी आपले तिकीट जमा करावे लागेल. ही सुविधा ऑफलाईन तिकीटासाठीच उपलब्ध आहे. ऑनलाईन बुक केलेल्या तिकीटांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही.

भारतीय रेल्वेमार्फत प्रवाशांना आपल्या कन्फर्म, RAC, वेटिंग तिकीटात प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा दिली जाते. या तिकीटांवरील प्रवासाची तारीख निर्धारित शुल्क भरल्यावर त्याच स्थानकासाठी, त्याच श्रेणी किंवा उच्च श्रेणीसाठी 'Preponed' किंवा 'Postponed' करता येते.

याशिवाय रेल्वे प्रवाशांना आपला प्रवास वाढवण्यासाठी प्रवासाच्या बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करण्यासाठी आणि तिकीटं उच्च श्रेणीमध्ये अपग्रेड करण्याचीदेखील परवानगी देते. यापैकी काही सुविधा केवळ ऑफलाईन तिकीटांसाठी लागू आहेत. तर इतर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही तिकीटांसाठी उपलब्ध आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com