आता करोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना एक महिन्याची 'पगारी सुटी'

आता करोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना एक महिन्याची 'पगारी सुटी'
करोना

लखनौ | Lucknow

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचे वृत्त समोर येत आहे. आता करोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) एक महिन्याची पगारी सुट्टी (Paid leave) देण्याचा निर्णय योगी सरकारने (Yogi Government) घेतला आहे....

राज्यातील वाढत्या करोना रुग्णांच्या (Corona Patients) पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) योगी सरकारने काही महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार करोनाची (Corona) लागण झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना १ महिन्याची पगारी सुट्टी मिळेल.

तसेच करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना २१ दिवसांची सुट्टी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंटेनमेंट झोन (Containment Zone) जाहीर करण्यात आलेल्या परिसरातून येणाऱ्या कर्मचाऱ्याला २१ दिवसांची सुट्टी मिळणार आहे, असा निर्णय योगी सरकारने (Yogi Government) घेतला आहे.

याशिवाय एखाद्या करोना पॉझिटिव्ह (Corona Positive) कर्मचाऱ्यास एक महिन्यापेक्षा जास्त सुट्टी हवी असल्यास नोंदणीकृत ऍलोपॅथी डॉक्टरकडून (allopathy Doctor) प्रमाणपत्र द्यावे लागेल. करोनाव्यतिरिक्त इतरदेखील गंभीर आजारांसाठी ही सुट्टी कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असेदेखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.