खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढणार? कोर्टाने 'या' प्रकरणी जारी केली नोटीस

खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढणार? कोर्टाने 'या' प्रकरणी जारी केली नोटीस

नवी दिल्ली | New Delhi

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्या अचडणी वाढण्याची शक्यता आहे. लखनऊमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याच्या प्रकरणातील याचिका जिल्हा (Petetion Filled Against Rahul Gandhi) आणि सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारली आहे. या याचिकेवरील सुनावणीसाठी न्यायालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली (Notice To Rahul Gandhi) असून सुनावणीसाठी १ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे. तसेच, ही याचिका सुनावणीसाठी खासदार/आमदार न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात हस्तांतरित करण्यात आली आहे.

या प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल फौजदारी खटला रद्द करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाचा आदेशाविरोधात जिल्हा आणि सत्र व्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांच्या कोर्टात दाद मागण्यात आली. ही याचिका स्वीकार करत न्यायालयाने राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील लोकांना नोटीस जारी करत याचिका एमपी एमएमए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात स्थानांतरित करण्यात आले.

खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढणार? कोर्टाने 'या' प्रकरणी जारी केली नोटीस
रात्री मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची ‘वर्षा’वर दोन तास बैठक, कशावर झाली चर्चा?

याचिकाकर्ते नृपेंद्र पांडेय यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करत कनिष्ठ न्यायालयाकडे एक तक्रार दाखल केली होती. यामध्ये राहुल गांधी यांच्याकडून भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे म्हटले होते. तसेच, राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे जाणीवपूर्वक सावरकरांविरोधात भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला होता.

कनिष्ठ न्यायालयाने प्रथम हा अर्ज तक्रार म्हणून दाखल करण्याचे आदेश दिले, परंतु नंतर ही तक्रार अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचे सांगत फेटाळण्यात आली. दरम्यान कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाला देखरेख याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com