Video : न्यायाधीशांचा अपघात नव्हे हत्या (पहा व्हिडीओ)

Video : न्यायाधीशांचा अपघात नव्हे हत्या (पहा व्हिडीओ)

धनबाद / Dhanbad - झारखंड येथील एका न्यायाधीशांचा बुधवारी ऑटोने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा अपघात नसून हत्या असल्याचे उघडकीस आले आहे. हे प्रकरण आज सर्वोच्च न्यायालयात गेलेे असून भारताचे मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी आपण याबाबत झारखंड उच्च न्यायालयाशी बोललो असल्याची माहिती दिली.

या प्रकरणात आत्ताच हस्तक्षेप करणार नाही, या घटनेची आम्हाला माहिती असून यावर आमचे लक्ष आहे. असं मुख्य न्यायाधीश रमण यांनी स्पष्ट केलं.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवारी सकाळी धनबादचे अतिरिक्त न्यायाधीश उत्तम आनंद मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. सकाळी सात वाजले तरी ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

मात्र, याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. न्यायाधीशांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आला असल्याचे आता समोर आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये, न्यायाधीश उत्तम आनंद हे आपल्या राहत्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर मॉर्निंग वॉक करत होते. यावेळी रस्त्यावर एकही वाहन नव्हते. पाठीमागून आलेल्या एका ऑटोने त्यांना जाणून-बुजून धडक दिली असल्याचे दिसत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोने धडक दिल्यानंतर न्यायाधीश उत्तम आनंद हे रस्त्याच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. एका व्यक्तीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी ऑटो चालक व त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com