चित्रपट, वेब सीरिजना संरक्षण मंत्रालयाची एनओसी अनिवार्य

सैन्य दलांविषयी आक्षेपार्ह सादरीकरण
चित्रपट, वेब सीरिजना संरक्षण मंत्रालयाची एनओसी अनिवार्य

नवी दिल्ली | New Delhi -

चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये भारतीय लष्करी अधिकार्‍यांबाबत आक्षेपार्हरीत्या सादरीकरण केले जात असल्याची गंभीर दखल केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने Ministry of Defence घेतली आहे. चित्रपट, वेब सीरिज आणि माहितीपट film, documentary and web series सुरक्षा दलांवर आधारित असतील तर त्यासाठी आधी संरक्षण मंत्रालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) No Objection Certificate (NOC) घ्यावे लागेल, असे संरक्षण मंत्रालयाने सेंसॉर बोर्ड आणि माहिती प्रसारण मंत्रालयाला कळवले आहे.

अलीकडे काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये लष्करी अधिकारी आणि जवानांबद्दल चुकीचे सादरीकरण केले गेले तसेच लष्करी गणवेशाचा अवमान झाला अशा तक्रारी संरक्षण मंत्रालयाकडे आल्या होत्या. त्यात कोड-एम, एक्स एक्स एक्स अनसेंसर्ड (सीझन-2) या वेब सीरिजचा समावेश होता. काही प्रकरणांमध्ये माजी जवानांनी पोलिसातही तक्रारी दाखल केल्या आणि या वेब सीरिजच्या निर्मात्यांवर तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान हकिकत, बॉर्डर, लक्ष्य, जमीन, उरी हे चित्रपट सैन्य दलावर बेतलेले आहेत. मात्र, आता यापुढे सैन्य दलावर चित्रपट बनवताना संरक्षण मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. कलाकृती चित्रित करून पूर्ण झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवल्यावरच संबंधित चित्रपट प्रदर्शित करता येणार आहे, असाा नवा नियम नुकताच लागू करण्यात आला आहे.

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली सैन्य दलांविषयी आक्षेपार्ह गोष्टी प्रदर्शित होतात. त्यामुळे सैन्य दलातील जवानांच्या भावना दुखावल्या जातात. यामुळे वाद निर्माण होतात. यामुळे हे वाद टाळण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ही नामी युक्ती काढली आहे. त्यानुसार, चित्रपट, वेब सीरीज, मालिकांमध्ये सैन्य दलाविषयी कोणतीही माहीती दाखवण्याआधी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com