Nobel Prize : ‘हिपॅटायटिस सी’ चा शोध घेणारे तिघांना नोबेल

तीन संशोधकांना हेपिटायटीस सी व्हायरसच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर
Nobel Prize for Medicine 2020
Nobel Prize for Medicine 2020

दिल्ली | Delhi

आज मेडीसीन क्षेत्रातील नोबेल पुरस्कारच्या मानकर्‍यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा प्रतिष्ठित पुरस्कार हार्वे जे अल्टर (Harvey J Alter), मायकेल ह्यूटन (Michael Houghton) आणि चार्ल्स एम. राईस (Charles M. Rice) या तिघांना जाहीर करण्यात आला. दरम्यान हेपिटायटीस सी व्हायरसच्या (Hepatitis C virus) संशोधनातील त्यांच्या कामगिरीसाठी यंदा त्यांना हा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

याची अधिकृत घोषणा स्टॉकहोल्म मधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये (Karolinska Institutet in Stockholm) नोबेल फोरम वर करण्यात आली. आयुष्य बदलून टाकणार्‍या Medicine, Physics, आणि Chemistry क्षेत्रातील मान्यवरांचा नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षीच या पुरस्काराच्या विजेत्यांबद्दल कुतुहल असते. यंदा पहिलाच मेडीसीन क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झालेला आहे. नोबेल पुरस्कार विजेत्याला सुवर्ण पदक, 10 मिलियन Swedish kronor ची रक्कम म्हणजेच अंदाजे 1,118,000 अमेरिकन डॉलर मिळतात

काय आहे हिपॅटायटिस

हिपॅटायटिस दोन ग्रीक शब्दांपासून तयार झालेला शब्द आहे. लिव्हर व जलन (इन्फ्लेमेशन)हे शब्द मिळून हिपॅटायटिस तयार झाला आहे. हा आजार व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो. अतिमद्यपान, पर्यावरणात अधिक प्रदूषणामुळे हा आजार होतो. १९४० मध्ये हिपॅटायटिस दोन आजारांची माहिती मिळाली. हिपॅटायटिस ए प्रदूषित पाण्यामुळे तर हिपॅटायटिस बी रक्त व शरीरातील फ्लूड ट्रांसमिटमुळे होते. या आजारामुळे लिव्हर सिरोसिस व लिव्हर कँन्सर होतो. या आजाराचे संक्रमन झाल्यावरसुद्धा सदृढ लोकांमध्ये त्याची लक्षणे दिसत नाही.

नोबेल पुरस्काराचा इतिहास

नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड बर्नार्ड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये पहिल्यांदा हे पुरस्कार देण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com