Nobel Peace Prize 2020 - UN च्या 'वर्ल्ड फूड प्रोग्राम'ला शांततेचा नोबेल पुरस्कार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा यांचीही नावे होती चर्चेत
UN World Food Programme
UN World Food Programme

दिल्ली । Delhi

जागतिक सन्मानाचे पुरस्कार नॉर्वेच्या नोबेल समितीने जाहीर केले आणि कोणालच अपेक्षित असलेल्या यादीत नसलेल्या नावावर शांतता पुरस्काराची मोहोर उमटली गेली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक अन्न कार्यक्रमाला (UN World Food Programme) यंदाचं शांततेचं नोबेल मिळणार आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी जवळपास ३१८ जण स्पर्धेत होते . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा यांचीही नावे चर्चेत होती.

वर्ल्ड फूड प्रोग्रॅमला हा मानाचा पुरस्कार जाहीर करून नॉर्वेच्या नोबेल कमिटीने मोठं भाष्य केलं आहे. साऱ्या जगाचं लक्ष भूकबळींसारख्या भयंकर वास्तवाकडे वळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जगभरात दरवर्षी लाखो लोक पुरेसं आणि योग्य अन्न न मिळाल्याने कुपोषित राहतात, काही जण अन्नावाचून प्राणही सोडतात. संपूर्ण मानव जातीला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही समस्या आहे. अन्नसुरक्षेसाठी झटणाऱ्या जागतिक कार्यक्रमाला नोबेलने सन्मानित केल्यामुळे जगाचं लक्ष या समस्येकडे वळवण्याचा नोबेल कमिटीचा प्रयत्न आहे.

UN World Food Programme
गणितात नोबेल का दिला जात नाही ?

युद्ध-संघर्षग्रस्त भागातील शांततेसाठी, परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेनंतर १९६३ मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध देशांमधून निधी दिला जातो.

गुरुवारी अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वीडीश अॅकेडमीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. लुईस यांच्या अद्वितीय काव्य रचनेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने जाहीर केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com