नवी दिल्ली -

करोना संकटामुळे जगभरात चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे देशात यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा विदेशी प्रमुख पाहुण्याविनाच

होणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या संसर्गामुळे अन्य देशाच्या किंवा सरकारच्या प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण स्वीकारले देखील होते. परंतु ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना मायदेशात थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला. त्यानंतर प्रजासत्ताक दिन सोहळयासाठी कोणाला निमंत्रित करणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. परंतु आता करोना स्थितीमुळे कुठल्याही विदेशी प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.