
दिल्ली | Delhi
भारतीय चलनी नोटांवर (Bank note) आता राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) जोडीला इतरही महापुरुषांचे फोटो झळकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आता आरबीआयने याबाबत खुलासा केला आहे. आरबीआयने (RBI) ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे की, 'सध्याच्या चलनात आणि बँकेच्या नोटांमध्ये कुठलाही बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या आरबीआयकडे आलेला नाही.'
त्यामुळे आरबीआयच्या स्पष्टीकरणानंतर भारतीय चलन नोटांवर महात्मा गांधींशिवाय इतर कोणाचाही फोटो वापरण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय होत होत्या चर्चा?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पहिल्यांदाच नोटेवरील फोटो बदलण्याचा विचार करत आहे. रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांचा महात्मा गांधींसोबतचा फोटो भारतीय चलनावर विचारात घेतला जात असल्याचे बोलले जात होते.