एमएसएमई क्षेत्रात 5 लाख नवे रोजगार निर्माण होतील - नितीन गडकरी
देश-विदेश

एमएसएमई क्षेत्रात 5 लाख नवे रोजगार निर्माण होतील - नितीन गडकरी

स्वावलंबन ई-समिट 2020

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

भारतात एमएसएमई क्षेत्राचं मोठं योगदान आहे. तसंच येत्या काळात या क्षेत्रात 5 कोटी नवे रोजगार निर्माण होतील अशी अशा आहे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin-gadkari) यांनी व्यक्त केलं. स्वावलंबन ई-समिट 2020 मध्ये गडकरी बोलत होते. MSME

देशाच्या विकासात एमएसएमई क्षेत्राचं मोठं योगदान आहे. जीडीपीच्या वाढीच्या दरात 30 टक्के उत्पन्न हे एमएसएमई क्षेत्राचं आहे. आतापर्यंत या क्षेत्रात आम्ही 11 कोटी रोजगार निर्माण केले, माझा विश्वास आहे आणि विचार आहे की येत्या पाच वर्षांमध्ये जीडीपीच्या वाढीचा दरातील एमएसएमई क्षेत्राचं उत्पन्न 30 टक्क्यांवरून 50 टक्के करू आणि निर्यातही 48 टक्क्यांवरून वाढवून 60 टक्के करत 5 कोटी नवे रोजगारही निर्माण करू, असंही ते म्हणाले.

ज्या उद्योगांनी नोंदणी केली नाही त्यांना एमएसएमई क्षेत्रांना मिळणारा फायदा मिळवण्यासाठी सूक्ष्म उद्योगांअंतर्गत नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. छोट्या ट्रेडर्सनाही सोबत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्हाला एनजीओच्या मदतीची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. करोना संकटाचा सामना करण्यासाठी 20 लाख कोटी रूपयांच्या ऐतिहासिक पॅकेजमधील सर्वाधिक फायदा एमएसएमई क्षेत्राला देण्यात आला आहे. याअंतर्गत एमएसएमई क्षेत्राला विना गॅरंटी लोनच्या सुविधेचाही लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएसएमी क्षेत्र 12 कोटींपेक्षा अधिक लोकांसाठी रोजगार निर्माण करत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यापूर्वी म्हणाल्या होत्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com