नीरव मोदीविरोधात सर्वात मोठी कारवाई; २५३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

नीरव मोदीविरोधात सर्वात मोठी कारवाई; २५३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

मुंबई | Mumbai

फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीशी (Nirav Modi) संबंधित कंपन्यांची हिरे, दागिने आणि बँक ठेवींसह एकूण 253.62 कोटींची मालमत्ता ईडीने (ED) जप्त केली आहे...

सर्व जंगम मालमत्ता हाँगकाँगमध्ये (Hong Kong) आहेत आणि मनी लॉन्ड्रिंगच्या (money laundering) चौकशीचा भाग म्हणून जप्त करण्यात आल्या आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार नीरव मोदीच्या मालमत्तेची तात्पुरती जप्ती करण्यात आली आहे.

नीरव मोदीविरोधात सर्वात मोठी कारवाई; २५३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
...अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात (Britain Prison) आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank) दोन अब्ज डॉलर्सच्या फसवणुकीतील तो मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

नीरव मोदीने त्याचा काका मेहुल चोक्सी याच्यासोबत मिळून पंजाब नॅशनल बँकेत हेराफेरी केली होती. नीरव मोदी गीतांजली या ब्रँड नावाने हिऱ्यांचा व्यवसाय केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com