मनसुख हिरेन हत्या प्रकरण: एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

मनसुख हिरेन हत्या प्रकरण: एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक
प्रदीप शर्मा

मुंबई - एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या अंधेरीमधील घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली.

मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएकडून तपास सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई सुरु असून प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात एनआयएने याआधी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली होती. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.

प्रदीप शर्मा
देशात 24 तासांत ‘इतके’ नवे करोना रुग्ण
प्रदीप शर्मा
बारावीचा निकाल 31 जुलै रोजी, असे ठरले सूत्र

दरम्यान, मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात याआधीही दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याची शक्यता असून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com