ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदना यांचे करोनामुळे निधन

ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदना यांचे करोनामुळे निधन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदना यांचे निधन झाले. नुकतीच त्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पत्रकार सुधीर चौधरी यांनी ट्विटरद्वारे दिली.

सुधीर चौधरी म्हणाले की, 'थोड्या वेळपूर्वीच जितेंद्र शर्मा यांचा फोन आला. त्यांनी जे म्हटले ते ऐकून हात थरथरत आहेत. आमचे मित्र आणि सहयोगी रोहित सरदाना यांच्या मृत्यूचे ते वृत्त होते. हा व्हायरस आपल्या किती जवळच्यांना घेऊन जाणार आहे याची कल्पना केली जाऊ शकत नाही. यासाठी मी तयार नव्हतो. हा देवाने केलेला अन्याय आहे...!ॐ शान्ति.'

बर्‍याच काळापासून टीव्ही माध्यमांचा चेहरा असलेले रोहित सरदाना सध्या 'आज तक' या वृत्तवाहिनीवर प्रसारित होणार्‍या 'दंगल' या कार्यक्रमाला अँकरींग करत होते.

2018 मध्येच रोहित सरदाना यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

'मित्रांनो, ही अत्यंत वाईट बातमी आहे. प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन झाले आहे. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. असे चौधरी यांनी ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com